मृत्युपत्र म्हणजे काय?
मृत्युपत्र म्हणजे व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे स्थावर किंवा जंगम मालमत्तेचे व्यवस्थापन कशाप्रकारे व्हावे तसेच कोणती मालमत्ता कोणाला मिळावी, हे सांगणारा लिखित स्वरूपातील मृत्युपत्र कर्त्याने करून अथवा लिहून ठेवलेला नोंदणी कृत कायदेशीर दस्तऐवज होय. ज्यामध्ये स्वतःच्या इच्छेनुसार मृत्यूनंतर मालमत्ता कोणाला द्यायची आहे हे नमूद केलेले असते. मृत्युपत्र का करावे?
मृत्यूनंतर मालमत्तेसाठी वारसांमध्ये वाद निर्माण होऊ नयेत. तसेच मृत्युपत्र कर्त्याची स्व कष्टाची खरेदीची मिळकत मृत्युपत्र कर्त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या - इच्छेनुसार मालमत्तेचे वाटप करता येते. तसेच वारसान व्यतिरिक्त मृत्युपत्र कर्त्याच्या इच्छेनुसार मृत्युपत्र करता आपल्या मालमत्तेतील हिस्सा अथवा सावर किंवा जंगम मिळकत ही स्वैच्छेने कोणासही देऊ शकतो तसेच मृत्युपत्र नोंदणीकृत करून घेऊ शकतो.- कोर्टाच्या गुंतागुंतीपासून बचाव होतो.
मृत्युपत्र कोण करू शकते?
मृत्युपत्र हा कोणीही भारतीय नागरिक ज्याचे वय १८ वर्षांहून अधिक आहे. - जो मानसिक दृष्ट्या सक्षम आहे (मनोरुग्ण नसावा). - जो भारतीय नागरिक आहे. तसेच ज्याच्या नावे स्थावर अथवा जंगम मालमत्ता आहे तसेच ती स्व कष्टाची मिळकत अथवा खरेदी आहे म्हणजेच त्याच्या मालकीची आहे.मृत्युपत्र करण्याची कायदेशीर प्रक्रिया
1. दस्तऐवज स्वरूपात मृत्युपत्र तयार करणे
2. स्पष्टपणे मालमत्तेचे वितरण नमूद करणे
3. दोन साक्षीदारांची स्वाक्षरी आवश्यक
4. डॉक्टरचे प्रमाणपत्र असल्यास विश्वासार्हता वाढते
5. रजिस्ट्रेशन बंधनकारक आहे.
मृत्युपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड/पॅन कार्डमालमत्तेचे पुरावे (७/१२, सेल डीड)
साक्षीदारांचे ओळखपत्र
डॉक्टरचे प्रमाणपत्र मानसिक दृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र.
मृत्युपत्राचे फायदे
मृत्युपत्र कार्त्याच्या मृत्यूनंतर वारसांमधील वाद टाळता येतो. तसेच मालमत्ता मृत्युपत्र कर्त्याच्या इच्छेनुसार योग्य त्या ठिकाणी योग्य त्या व्यक्तीच्या हाती जाते. मृत्युपत्र करून ठेवले असल्यास भविष्यातील वारसांमधील मालमत्तेबाबत अथवा मिळकतीबाबतचे वाद निर्माण होत नाहीत.महत्वाच्या टीप:
जर मृत्युपत्र नसले आणि कोणतीही वाटणी केलेली नसेल, तर मालमत्ता हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार वाटली जाते, जे काही वेळा व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध असते.मृत्युपत्र की अंमलबजावणी करण्याची पद्धती अथवा कशी
करावी?
बहुतांश मृत्युपत्र कर्त्याच्या मृत्यूनंतर मृत्युपत्राबद्दलची माहिती मिळाल्यानंतर वारस मृत्युपत्र घेऊन तलाठी अथवा तहसीलदार कार्यालय यांच्याकडे धाव घेतात. परंतु काही वेळा मृत्युपत्रातील उल्लेखानुसार काही वारसांना वगळल्यामुळे अथवा वडिलार्जित मी कधी मध्ये मृत्युपत्र करून ठेवलेले असल्यास वारसांनी हरकत घेतल्यास मृत्युपत्राने होणारा फेरफार मंजूर होत नाही. अशावेळी तलाठी अथवा मंडळ अधिकारी मृत्युपत्रातील ज्यांना मिळकत दिली आहेत अशा व्यक्तीस कोर्टाकडून अथवा न्यायालयातून प्रोबेट घेऊन येण्यास सांगतात.
लिविंग व्हिल
लिविंग व्हिल हायती मध्ये केलेले मृत्युपत्र म्हणजेच लिविंग विल असे होय.
लिविंग व्हिल म्हणजे हयातीत आपल्या मालमत्तेचे व आपल्या भविष्यातील आजारातील होणाऱ्या खर्चासाठी मेडिकलच्या बिलांसाठी त्याची व्यवस्था कोणत्या प्रकारे करावी कोणत्या प्रकारे बिल भरले जावे तसेच आपली कोणती मिळकत विकण्याची आहे किंवा नाही आपल्या हयातीमध्ये आपण आपली लिविंग व्हिल म्हणजे यथास्थिती मृत्युपत्र तयार करू शकतो ही संकल्पना सध्या उदयास आलेली आहे.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: Adv. Atul Devkar – 9920513093
प्रश्नोत्तरे (FAQ)
1. मृत्युपत्र म्हणजे काय?
मृत्यूनंतर मालमत्तेसाठी वारसांमध्ये वाद निर्माण होऊ नयेत. तसेच मृत्युपत्र कर्त्याची स्व कष्टाची खरेदीची मिळकत मृत्युपत्र कर्त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या - इच्छेनुसार मालमत्तेचे वाटप करता येते. तसेच वारसान व्यतिरिक्त मृत्युपत्र कर्त्याच्या इच्छेनुसार मृत्युपत्र करता आपल्या मालमत्तेतील हिस्सा अथवा सावर किंवा जंगम मिळकत ही स्वैच्छेने कोणासही देऊ शकतो तसेच मृत्युपत्र नोंदणीकृत करून घेऊ शकतो.- कोर्टाच्या गुंतागुंतीपासून बचाव होतो.
2. मृत्युपत्र करण्याचा कायदा कोणता आहे?
भारतामध्ये मृत्युपत्रावर Indian Succession Act, 1925 हा कायदा लागू होतो. यामध्ये हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन यांच्यासाठी स्वतंत्र तरतुदी आहेत.
3. मृत्युपत्र लिहिणे बंधनकारक आहे का?
नाही, मृत्युपत्र लिहिणे ऐच्छिक असते. पण मृत्यूनंतर संपत्तीचे वाद टाळण्यासाठी मृत्युपत्र असणे फायद्याचे असते.
4. मृत्युपत्र कोणी लिहू शकतो?
18 वर्षांहून अधिक वयाचा, मानसिकदृष्ट्या सक्षम आणि इच्छाशक्तीने निर्णय घेणारा कोणताही व्यक्ती मृत्युपत्र लिहू शकतो.
5. मृत्युपत्र कायदेशीर कधी ठरते?
जेव्हा ते योग्यरितीने लिहिले जाते, साक्षीदारांच्या समोर सही केली जाते आणि ते व्यक्तीच्या मृत्यूनंतर अमलात येते.
6. मृत्युपत्र नोंदणी आवश्यक आहे का?
मूलतः केल्यास त्याचे कायदेशीर मूल्य अधिक दृढ होते. नोंदणीसाठी सब-रजिस्ट्रार ऑफिस** मध्ये जावे लागते.
7. मृत्युपत्र रद्द किंवा बदल करता येते का?
हो, मृत्युपत्र लिहिणारा व्यक्ती जिवंत असताना ते कधीही रद्द किंवा नवीन मृत्युपत्र तयार करू शकतो.
8. मृत्युपत्र नसेल तर संपत्तीचे वाटप कसे होते?
जर मृत्युपत्र नसेल, तर संपत्तीचा वाटा वारस कायदा (Succession Law) प्रमाणे ठरतो. म्हणजेच कायदेशीर वारसांना ठराविक पद्धतीने वाटप होते.
9. मृत्युपत्र लिहिताना काय काळजी घ्यावी?
* स्पष्ट आणि सोप्या भाषेत लिहावे
* मालमत्तेची संपूर्ण यादी द्यावी
* साक्षीदाराच्या उपस्थितीत सही करावी
* शेवटचा निर्णय स्पष्ट असावा
10. मृत्युपत्रासाठी वकील घेणे आवश्यक आहे का?
कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी व वाद टाळण्यासाठी अनुभवी वकील कडून मदत घेणे योग्य ठरते, पण ते बंधनकारक नाही.
खूप छान माहिती दिली आहे
उत्तर द्याहटवा