लक्ष्मी मुक्ती योजना बायकोचे नाव ७/१२ उताऱ्यावर मोफत चढवा.

✅ कोणतेही खरेदीखत किंवा बक्षीस पत्र न देता पत्नीचे नाव ७/१२ वर मोफत चढवा – संपूर्ण प्रक्रिया 

कोणतेही खरेदीखत किंवा बक्षीस पत्र न देता पत्नीचे नाव ७/१२ वर मोफत चढवा – संपूर्ण प्रक्रिया

नमस्कार शेतकरी मित्रांनो!
आपल्या](https://knowourlawinmarathi.blogspot.com)या ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत एक महत्त्वपूर्ण, उपयोगी आणि खर्चविरहित प्रक्रिया आपल्या कायदेशीर पत्नीचे नाव आपल्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर कोणत्याही खरेदीखत किंवा बक्षीस पत्राशिवाय मोफत कसे चढवायचे? चला तर मग पाहू


मित्रांनो, १५ सप्टेंबर १९९२ रोजी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचे परिपत्रक काढले होते. त्यात स्पष्टपणे नमूद केले आहे की:
( "*जर पतीने आपल्या नावावर असलेल्या वैयक्तिक जमिनीमध्ये पत्नीचे नाव सहहिस्सेदार म्हणून चढवण्याची विनंती केली, तर महसूल विभागाने महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 अंतर्गत फेरफार करून नाव नोंदण्यास हरकत नाही. असे परिपत्रक काढले आहे व या योजनेचे नाव आहे लक्ष्मी मुक्ती योजना.)
याचा अर्थ — तुमच्या पत्नीचे नाव ७/१२ वर चढवण्यासाठी तुम्हाला खरेदीखत, बक्षीस पत्र करण्याची आवश्यकता नाही. व लक्ष्मी मुक्ती योजनेने तुमचा खूप पैसे ही वाचू शकतात.

✅ स्टॅंप ड्युटी वाचते – खूप कमी खर्चात काम होते. जवळ जवळ 10 ते 15 हजार रुपये वाचतात ही प्रक्रिया करताना
खरेदीखत लागत नाही तसेच स्टॅंप ड्युटी भरावी लागत नाही व 
नोंदणी फीही लागत नाही . फक्त काही कागदपत्रे काढण्यासाठी तुमचा खर्च होतो.
🟢 याचा थेट अर्थ —तुमचा हजारो रुपयांचा खर्च वाचतो.

आता सर्वात मोठा प्रश्न ही 📝 प्रक्रिया कोण व कशी करू शकतो?

तर ही प्रक्रिया जमिनीचा मालक  म्हणजे फक्त पतीच हे करू शकतो आणि ह्या  परिपत्रकानुसार  फक्त नवऱ्याने विनंती केली तर पत्नीचे नाव सहहिस्सेदार म्हणून चढू शकते. 
( पण ही प्रक्रिया करण्यासाठी पतीचे नाव हे वैयक्तिक खातेदार असणे आवश्यक आहे तरच हे होऊ शकते आणि सामाईक खातेदार असले तर बाकीच्यांची ही म्हणजे सहहिसेदारांची आवश्यकता लागते) तसेच जमीन ही सामाईक नसावी.तसेच पती-पत्नी कायदेशीर विवाहबद्ध असावेत त्यांच्याकडे लग्नाचे कायदेशीर पुरावे आवश्यक आहेत.तसेच पत्नीचे नाव आधीच ७/१२ वर नसावे तररच ही प्रक्रिया होऊ शकते.


📑 आवश्यक कागदपत्रे (Documents Required)

सदर प्रक्रियेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे काय लागतात ती खालील प्रमाणे 

1. ७/१२ उताऱ्याची प्रत
2. पतीचे प्रतिज्ञापत्र (स्टॅंपवर)
3. पती-पत्नीचे आधार कार्ड
4. रेशन कार्ड
5. रहिवासी दाखला
6. विवाह प्रमाणपत्र (Marriage Certificate)
7. इतर कागदपत्रे – तलाठ्याच्या मागणीनुसार
तसेच तलाठ्याने मागितल्यास इतर कागदपत्रे. लागतील 
 आता प्रक्रिया खालील प्रमाणे असते 


 🔄 प्रक्रिया टप्प्याटप्प्याने (Step-by-step Guide)

 १. सदरील लक्ष्मी मुक्ती योजनेचे शासन परिपत्रक goverment च्या वेबसाईटला जाऊन डाउनलोड करा किंवा मी ब्लॉग च्या शेवटी परिपत्रकाची PDF दिली आहे तेथे जाऊन डाउनलोड करून घ्या व (आपल्या गावच्या तलाठ्याकडे जाऊन दाखवा)


 ▶️ २. प्रतिज्ञापत्र तयार करा

त्यानंतर  पतीने आवश्यक त्या स्टॅंपवर अ‍ॅफिडेव्हिट करा व त्यात नमूद करा की – ("मी माझ्या पत्नीचे नाव सहिस्सेदार म्हणून चढवण्यास इच्छुक आहे, परिपत्रकानुसार किंवा तलाठ्याकडून प्रतिज्ञापत्राचा ड्राफ्ट घ्या व त्या प्रकारे बनवा)


 ▶️ ३. कागदपत्रे तलाठ्याकडे सादर करा

त्यानंतर ही सर्व कागदपत्रे जमा झाल्यावर गावच्या तलाठ्याकडे जाऊन जमा करा तसेच सर्व कागदपत्रांची झेरॉक्स दया व एक अर्ज असतो ता तुम्हाला तलाठ्याकडे मिळेल. त्यानंतर तलाठ्याकडे अर्ज करा .


▶️ ४. फेरफार प्रक्रिया सुरू होईल

त्यानंतर तुमच्या सर्व कागदपत्रांची तलाठी तपासणी करेल व त्या नंतर फेरफार प्रस्ताव तयार करेल . व त्या नंतर काही दिवसात तुम्हचा फेरफार तयार होईल.


▶️ ५. १५–३० दिवसात नाव चढवले जाते

त्या नंतर सर्व  प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पत्नीचे नाव ७/१२ उताऱ्यावर सहहिसेदार म्हणून  होण्यासाठी फेरफार होईल व गावच्या चावडीवर प्रदर्शित होईल. व नोटीसीचा कालावधी संपल्यावर तुमच्या पत्नीचे नाव 7/12 उताऱ्यावर सहहिसेदार म्हणून लागेल.


📌 विशेष टीप (Important Notes)

तलाठी किंवा अधिकारी अडथळा करत असल्यास, परिपत्रक दाखवा
 पत्नीचे नाव चढल्यावर, भविष्यात तिचा मालकी हक्क, वारसा, पतसंस्थांतील व्यवहार अधिक स्पष्ट राहतात.
नाव चढवण्यासाठी वयक्तिक खातेदार असणे आवश्यक आहे. व कायदेशीर नवरा बायको असणारे कागदपत्रे आवश्यक आहेत.
 🎯 या प्रक्रियेचे फायदे (Benefits)
✅ पत्नीला कायदेशीर हक्क मिळतो
✅ खर्च शून्य — Stamp Duty, रजिस्ट्रेशन फी नाही
✅ वंशातील वादांना आळा
✅ जमीन वारशाच्या दृष्टीने सुरक्षित
✅ महिला सबलीकरणास हातभार
 

📄 परिपत्रक डाऊनलोड लिंक

👉 [परिपत्रक डाऊनलोड करा – 15 सप्टेंबर 1992 PDF](https://gr.maharashtra.gov.in/1145/Go...

१५ सप्टेंबर १९९२ चे महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक – लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत पत्नीचे नाव ७/१२ वर चढवण्यास मान्यता


💬 निष्कर्ष
शेतकरी मित्रांनो, माहितीच आपल्याला आपल्या हक्कांपर्यंत घेऊन जाते. तुमच्या कायदेशीर पत्नीचे नाव ७/१२ उताऱ्यावर चढवण्यासाठी कोणतीही गुंतागुंत नाही, खर्च नाही – फक्त माहिती आणि शेतकरी मित्रांना सोप्या भाषेत कायद्याचे ज्ञान मिळावे हीच अपेक्षा. धन्यवाद
🔁 शेअर करा व इतरांना मदत करा
तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल, तर ती तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा.


लेखक: व अधिक माहिती साठी संपर्क 
कायदेशिर सल्लागार 
Adv Atul L Devkar ( मुंबई, सातारा)
B.Com. LLB.GDC&A
mob - 9920513093

अधिक वाचा 

मुदत खरेदी म्हणजे काय? संपूर्ण माहिती आणि कायदेशीर मुद्दे

https://knowourlawinmarathi.blogspot.com/2025/06/blog-post_27.html 

म्रृत्यू पत्र म्हणजे काय ?
https://knowourlawinmarathi.blogspot.com/2021/05/blog-post.html 

बक्षीस पत्र म्हणजे काय ?संपूर्ण मार्गदर्शन 
https://knowourlawinmarathi.blogspot.com/2025/06/blog-post.html 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे. कृपया नम्र भाषेत अभिप्राय द्या."