टपाल खात्याची रजिस्टर्ड सेवा बंद – १ सप्टेंबरपासून मोठा बदल

भारतीय टपाल विभागाची रजिस्टर्ड पोस्ट सेवा १ सप्टेंबर २०२५ पासून बंद – आता स्पीड पोस्ट हा पर्याय.


 171 वर्षांनंतर टपाल खात्याची रजिस्टर्ड एडी सेवा १ सप्टेंबर 2025 पासून बंद होणार. स्पीड पोस्ट हा नवा पर्याय. जाणून घ्या संपूर्ण माहिती.

टपाल खात्याची रजिस्टर्ड सेवा १ सप्टेंबरपासून बंद – स्पीड पोस्टचा पर्याय

भारतीय टपाल खात्याने १७१ वर्षांपासून सुरु असलेली रजिस्टर्ड एडी सेवा १ सप्टेंबर २०२५ पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा जनसामान्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होती, विशेषतः सरकारी कार्यालयीन कामकाज, महत्वाचे कागदपत्रे आणि कायदेशीर नोटिसा पाठवण्यासाठी. पान आता ती बंद होणार आहे.

ReadMore:-https://www.lawinmarathi.in/2025/08/accident-under-motor-vehicles-act.html



निर्णयामागचे कारण

टपाल विभागाने स्पष्ट कारण न दिले असले तरी, अधिक कार्यक्षम आणि वेगवान सेवेसाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. स्पीड पोस्टद्वारे पार्सल कमी वेळेत पोहोचवता येते आणि त्याचे ट्रॅकिंगही सहज करता येते. त्यामुळे ग्राहकांना जलद आणि पारदर्शक सेवा देण्याचा उद्देश आहे.

अधिक वाचा 👇 

मुदत खरेदी म्हणजे काय ? कायदेशीर माहिती


सेवा कधी बंद होणार?

  • ३१ ऑगस्ट २०२५ हा रजिस्टर्ड एडी सेवेसाठी शेवटचा दिवस असेल.

  • रविवार असल्याने प्रत्यक्षात ३० ऑगस्ट रोजी या सेवेला निरोप दिला जाईल.

  • १ सप्टेंबरपासून स्पीड पोस्ट हा अधिकृत पर्याय म्हणून उपलब्ध असेल.

अधिक वाचा 👇 

रजिस्टर्ड एडी सेवेत काय मिळत होते?

रजिस्टर्ड टपाल सेवेतून पाठवलेल्या पत्र, नोटिसा किंवा कागदपत्रे स्वाक्षरीसह पोहोचल्याचा पुरावा मिळत असे.
यामुळे ती कायदेशीरदृष्ट्या अधिक महत्वाची ठरत असे.
विशेषतः सरकारी कार्यालये, वकिलांचे पत्रव्यवहार, बँका, आणि न्यायालयीन नोटिसांसाठी ही सेवा जास्त वापरली जात असे.

अधिक वाचा 👇 

मृत्युपत्र म्हणजे काय? कायदेशीर माहिती नियम व अटी


नव्या स्पीड पोस्ट सेवेत काय बदल होणार?

  • २० ग्रॅमच्या रजिस्टर्ड टपालासाठी पूर्वी २९ रुपये खर्च येत होता.

  • आता स्पीड पोस्टसाठी १५ रुपये अतिरिक्त म्हणजे ४४ रुपये खर्च होईल.

  • स्पीड पोस्ट ३५ किलो वजनापर्यंतचे पार्सल पाठवू शकते.

  • ट्रॅकिंग सुविधेमुळे पाठवलेल्या वस्तूंची स्थिती ऑनलाइन पाहता येईल.

  • वितरणाचा पुरावा (Delivery Proof) आता स्पीड पोस्टमध्येही मिळणार आहे.


या निर्णयाचा परिणाम

  • ग्राहकांना वेगवान सेवा मिळेल, मात्र खर्च थोडा वाढेल.

  • सरकारी व कायदेशीर कामकाजात बदल – जिथे रजिस्टर्ड पोस्ट अनिवार्य होती, तिथे आता स्पीड पोस्ट वापरावी लागेल.

  • टपाल विभागाला सेवा अधिक कार्यक्षम करण्यास मदत.


टपाल विभागाचा दावा

टपाल विभागाने सांगितले की, गतीमानता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी हा बदल आवश्यक होता. स्पीड पोस्टमुळे पार्सल ठराविक वेळेत पोहोचेल आणि ग्राहकांना वितरणाचा पुरावा मिळेल.

अधिक वाचा 👇 

सामूहिक खरेदी शेत जमिनीची वाटणी संपूर्ण प्रक्रिया


निष्कर्ष

१७१ वर्षांची परंपरा असलेली रजिस्टर्ड एडी सेवा आता इतिहासजमा होणार आहे. १ सप्टेंबर २०२५ पासून देशभरात स्पीड पोस्ट हा पर्याय सुरू होईल. नागरिकांनी या बदलाची माहिती ठेवून आपले व्यवहार त्यानुसार नियोजित करावेत.


1. भारतातील रजिस्टर टपाल सेवा कधीपासून बंद होणार आहे?
रजिस्टर टपाल सेवा 1 सप्टेंबर 2025 पासून बंद होणार आहे.

2. रजिस्टर टपाल सेवेला पर्याय म्हणून काय उपलब्ध असेल?
स्पीड पोस्ट सेवा रजिस्टर टपाल सेवेला पर्याय म्हणून उपलब्ध राहील.

3. रजिस्टर टपाल बंद करण्यामागे कारण काय आहे?
अधिक कार्यक्षम, जलद आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी रजिस्टर टपाल सेवा बंद करून स्पीड पोस्टची शिफारस करण्यात आली आहे.

4. स्पीड पोस्ट आणि रजिस्टर टपाल मध्ये शुल्काचा फरक काय आहे?
20 ग्रॅमपर्यंत रजिस्टर टपालसाठी 29 रुपये लागत होते, तर स्पीड पोस्टसाठी याच वजनावर 44 रुपये लागतील.

5. स्पीड पोस्ट सेवेत कोणते अतिरिक्त फायदे मिळतील?
स्पीड पोस्टद्वारे पार्सल कमी वेळेत पोहोचते, तसेच त्याचे ट्रॅकिंगही करता येते.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे. कृपया नम्र भाषेत अभिप्राय द्या."